मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केले.
राज यांच्या या भूमिकेवर सुजात आंबेडकर यांनी जोरदार निशाण साधत आधी तुमच्या मुलाला रस्त्यावर उतरायला सांगा, असे म्हटले होते. त्यानंतर आता दंगली घडवण्यात उच्चवर्गीय ब्राह्मणच पुढे असतात, असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांनाच आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी कृपा करून अशा प्रकारचे संस्कार मुलावर करू नयेत. मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे जाईल, पण जातीपातीचे राजकारण या मुलांना तरी शिकवू नका, असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला आहे.