22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसरकारच्या भरोशावर राहू नका

सरकारच्या भरोशावर राहू नका

एकमत ऑनलाईन

तुम्ही तुमचे मार्केट शोधा, गडकरी यांचा शेतक-यांना सल्ला
नागपूर : माझे मार्केट मी शोधले आहे, तुमचे मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजीपाला व फळ उत्पादन करणा-या शेतक-यांना दिला. एवढेच नाही तर शेतक-यांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, मी स्वत: सरकारमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सांगतो, असा सल्ला यावेळी गडकरी यांनी शेतक-यांना दिला.

नागपुरात अ‍ॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतक-यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. स्वत:च्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी कसे प्रयत्न केले, याचे उदाहरण उपस्थितांना सांगताना गडकरी यांनी सरकारच्या फार भरोशावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी
स्वत: प्रयत्न आवश्यक
सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतक-यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवशावर न राहता स्वत: कृती करायला पाहिजे. ज्या शेतक-यांनी प्रगती केली आहे, अशा शेतक-यांचा आदर्श घ्या, असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतक-यांना दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या