22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमहिलांना कमी लेखू नका; यशोमती ठाकूर

महिलांना कमी लेखू नका; यशोमती ठाकूर

एकमत ऑनलाईन

अमरावती : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत भाष्य करताना जीभ घसरली आहे. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, अशा शब्दांत त्यांनी टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडीतील महिला नेत्यांकडून टीका होत आहे.

काँगे्रस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्या म्हणतात, चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आली आहे की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या कान्स संदर्भावरून दिला आहे. काळ बदलला आहे, महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, खासदार सुळे यांनी मध्य प्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल केंद्र सरकारला विचारणार होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत ‘चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही’ असे म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या