37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रडॉ. तुकाराम मुंढे बदलीला स्थगिती द्यावी : ‘होश मे आओ, होश मे...

डॉ. तुकाराम मुंढे बदलीला स्थगिती द्यावी : ‘होश मे आओ, होश मे आओ नितीन गडकरी होश मे आओ’

एकमत ऑनलाईन

नागपूर : आम आदमी पक्षाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या आणि भाजपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. संविधान चौकातील आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आपच्या कार्यकत्यांनी ‘होश मे आओ, होश मे आओ नितीन गडकरी होश मे आओ’ अशा घोषणा दिल्या. मुंढे यांच्यामुळे आपले परिवार कोरोनाकाळात सुरक्षित आहेत, त्यांनी भ्रष्टाचाराला थारा दिला नाही, अशी फलके यावेळी झळकावण्यात आली आहे.

‘शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष’ अशी ओळख असण्याबरोबरच आपल्या कार्यशैलीने सर्वसामान्य जनतेचा भक्कम पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरलेले डॉ. तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरूनची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जनमानसात चांगलीच खळबळ उडाली. अनेक चांगली कामे करूनही केवळ सात महिन्यांतच ही बदली करण्यात आल्याने केवळ राजकीय द्वेषातून ही बदली करण्यात आल्याची भावना सर्वसामान्य नागपूरकरांनी व्यक्त केली आहे. ‘मुंढे यांची बदली मागे घेण्यात यावी,’ यासाठी शहरात विविध संघटना आंदोलने करीत आहेत. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरूनही मुंढेंच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झाल्या असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबद्दल चांगलाच रोष असल्याचे दिसून आले आहे.

मुंढे यांची बदली झाल्याचे वृत्त बुधवारपासूनच सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. फेसबूक, व्हॉटसअॅप यांच्यासह सोशल मीडियावर या बदलीविरुद्ध शहरातील सर्वसामान्य नागरिक व संघटनांनी चांगलाच रोष व्यक्त केला. शहरात चांगले काम करूनही केवळ सांत महिन्यात बदली करण्यात आल्याने केवळ राजकीय दबावापोटी ही बदली करण्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत ‘आम आदमी पार्टी’च्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंढे यांनी उत्तम कार्य केले. त्यानंतर केवळ राजकीय सुडापोटी ही बदली करण्यात आल्याबद्दल मुंढे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या.

महाबळेश्वर विकायला काढलेल्या २ भामट्यांना अटक

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या