22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रअवैध धंद्याविरुद्ध ड्रोन स्ट्राईक

अवैध धंद्याविरुद्ध ड्रोन स्ट्राईक

एकमत ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड : नदीकाठी अथवा झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांवर टाच आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसाकडून ड्रोनचा वापर केला जात आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे. या ड्रोन स्ट्राईकमुळे आता अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आळंदी पोलिस ठाणे हद्दीतील कोयाळी गावात याच ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. झाडाझुडुपांमध्ये भीमा नदीकाठी असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला आणि अंदाजे १० लाख रूपये किमतीचे २० हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले.

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी गावात गावठी हातभट्टी जोमात चालते. अशा तक्रारी वाढत होत्या. यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. पण पोलिसांना ही गावठी हातभट्टी दिसून येत नव्हती. तोपर्यंत पोलिस गावात येऊन गेले, याची खबर हातभट्टी मालकांला लागायची. मग एखादे दिवस हातभट्टी विक्री बंद व्हायची. पण दुसरा दिवस उजडताच गावात झिंगाटलेले महाभाग दिसून यायचे. मग पोलिसांनी ही गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवली.

त्यानुसार ड्रोन स्ट्राईक करायचे ठरले. ड्रोन हवेत गेला, पोलिसांनी एकाच ठिकाणी उभे राहून गावची टेहाळणी केली. गावात काय हातभट्टी दिसेना, मग ड्रोनचा मोर्चा गावालगतच्या झाडाझुडपांकडे वळविण्यात आला. तिथे दोन-तीन झाडांच्या मधोमध एक हातभट्टी आढळली, ड्रोनजवळ घेऊन याची खात्री करण्यात आली. मालकाला याची खबर लागण्याआधीच पोलिस तिथे पोहोचले. मग जेसीबीला पाचारण करत ही हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. अंदाजे १० लाखांची तब्बल २० हजार लिटर कच्चे रसायन याद्वारे नष्ट करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या