16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रक्रुझवर ड्रग्ज पार्टी, सेलेब्रिटी जाळ्यात

क्रुझवर ड्रग्ज पार्टी, सेलेब्रिटी जाळ्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईच्या अरबी समुद्रात एका आलिशान क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश अंमली पदार्थविरोधी पथक अर्थात एनसीबीने केला आहे. या क्रुझवर जवळपास १५०० लोक होते. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापा-यांचा समावेश आहे. एनसीबीने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात कोर्डेलिया या क्रुझरवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर करण्यात आला, अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे.

यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाचा समावेश आहे. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर एनसीबीच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. एनसीबीने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या