34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रसामान्यांसाठी कांद्याचे दर सुखावणारे

सामान्यांसाठी कांद्याचे दर सुखावणारे

एकमत ऑनलाईन

नाशिक : मनमाड, लासलगावसह नाशिकच्या बहुतांश बाजार समित्यांत शनिवारी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. पाच दिवसांपूर्वी ज्या कांद्याला प्रति किलो ४१ रुपये भाव मिळाला होता, त्याच कांद्याला शनिवारी १९ रुपये किलो भाव मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र शनिवारी अचानक भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आवक कमी होऊन देखील भावात मोठी घसरण का होत आहे असा प्रश्न बळिराजाला पडला आहे. इतर राज्यांत मागणी कमी झाली असल्याने भाव गडगडल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

सोमवारी प्रति क्विंटल कांदा भाव, जास्तीतजास्त ४१०४ रुपये होता. तर सरासरी ३७०० रुपये होता. परंतु शनिवारी (काल) हाच भाव जास्तीतजास्त २२२२ रूपयांवर, तर सरासरी १८०० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याचा भाव मोठ्या किमतीने घसरल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.गेल्या वर्षभरापासून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, महापूर, वादळ अशा अनेक आपत्तींना, संकटांना तोंड देत असलेल्या बळिराजाच्या चिंता अद्यापही कमी झालेल्या नाहीत. अनेक संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा कांद्याचा दर कोसळल्याने शेतक-यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

कांद्याचे भाव यापुढेही सुधारण्याऐवजी पुन्हा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच लाल कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शेतक-यांसाठीचे दिवस कठीण असल्याची परिस्थिती आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्‍यासाठी भाजप आक्रमक, अर्थसंकल्‍पीय अधिवेशन वादळी ठरणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या