26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअनेक जिल्ह्यांत पावसाअभावी शेतीची कामे रखडली

अनेक जिल्ह्यांत पावसाअभावी शेतीची कामे रखडली

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला, पण पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे खरिपाच्या पेरणीवर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाअभावी शेतीची कामे रखडली असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे धरणातील पाण्याचा साठा कमी होत असून अजून काही काळ पाऊस नाही झाला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातही पाणी कपातीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

साधारणपणे जूनअखेरीपर्यंत खरीप पेरणीच्या कामांना चांगला वेग आलेला असतो आणि राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय झालेला दिसतो. यंदा मात्र तशी स्थिती दिसत नाही. कारण यावर्षी म्हणावा तसा सगळीकडे मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही त्यामुळे शेतीच्या कामावर त्याचा परिणाम झाला. मान्सून दाखल झाला पण अजूनही त्याने म्हणावा तसा जोर पकडला नाही त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना अपेक्षित प्रमाणात वेग आलेला दिसत नाही.

उपलब्ध माहितीनुसार राज्यात आजवर १२ ते १३ टक्के पेरण्या झाल्याचे समजते. हे चित्र असेच काही दिवस राहिले तर खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही भागात अजूनही पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. कृषी खात्याच्या अहवालानुसार राज्यातील ७० तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे तर २२ तालुक्यांत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. कोकण विभागात सर्वांत कमी पेरणीची टक्केवारी झाली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे त्यामुळे पेरणी केलेली पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे मात्र येत्या १५ जुलैपर्यंत पेरणी होऊ शकते असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील धरण क्षेत्रातसुद्धा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-­या चार धरणांच्या क्षेत्रात कमी पाऊस झाला असल्याने पाणीसाठा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नाही . सध्याच्या स्थितीत केवळ चार धरणांत २.७२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाणीसाठा लक्षात घेता प्रशासनाने नव्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे म्हणजेच पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी कपात करावी लागण्याची वेळ येणार आहे .

सन २०१५ मध्ये अपु-या पावसामुळे पाणी कपातीची वेळ आली होती. जिल्ह्यातील अन्य धरण क्षेत्रांतसुद्धा पावसाचे प्रमाण कमीच आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या