25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्याचा वाद पेटला

दसरा मेळाव्याचा वाद पेटला

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष सुरू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होतो. मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तसेच दसरा मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईकांच्या मुलाखतीनंतर स्पष्ट झाले की, ईडीच्या भीतीमुळे हे सर्व तिकडे गेले आहेत. हिंदुत्व वगैरे काही नाही, यांच्या चेह-यावरचा हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला आहे. एकच नेता, एकच विचार, एकच मैदान हे ५० वर्षांपासून गाजत आल्याचे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटले.

दिल्लीवरून सूचना?
तुमच्या शाखेसमोर आमची शाखा, तुमच्या मेळाव्यासमोर आमचा मेळावा हा थिल्लरपणा आणि पोरकटपणा सुरू आहे. कोणाच्या दबावाखाली चालू आहे हे दिसून येत आहे. दिल्लीश्वराकडून त्यांना सूचना मिळत आहेत, हे लक्षात येत आहे. त्या सूचनाप्रमाणे शिंदे गट वागत असल्याचा दावा कायंदे यांनी केला.

शिंदे गटाकडून अर्ज सादर
आपल्या पक्षाची गद्दारी करून उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दसरा मेळावा तिथेच होणार असून असली आणि नकली कोण हे लोकांनी ओळखल्याचे कायंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी अर्ज सादर केला आहे. दरवर्षी मीच अर्ज करायचो. आताही मीच अर्ज केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या