28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळावा शिवतीर्थावर होणार अन् तेही शिवसेनेचाच

दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार अन् तेही शिवसेनेचाच

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि तेही शिवतीर्थावरच होणार असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

शिवतीर्थावर दरवर्षी होत असलेला दसरा मेळावा यावर्षी कुणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिंदे गट आणि शिवसेनेनेही मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती पण अद्याप पोलिसांकडून कुणालाच परवानगी देण्यात आली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचं आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

मातोश्री हे हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंदिराचा गाभारा आहे. त्याचं महत्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल, पण आता आम्ही शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या शिवबंधनामध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत. असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उद्धव कदम यांनी सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या