24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकास पठारावर पर्यटनासाठी ई बसेस !

कास पठारावर पर्यटनासाठी ई बसेस !

एकमत ऑनलाईन

मुंबई : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. त्यासाठी चार इलेक्ट्रिक बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व्हीसीव्दारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. कास पठारावर पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करण्यात येणार आहे.

युनिस्कोनेदेखील कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणास मान्यता दिली आहे. सह्याद्री पर्वतराजीत सातारा शहरापासून २५ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर जवळपास १० चौरस कि. मी. मध्ये पाहायला मिळतो. ८५०च्या वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळतात. त्यामुळे प्रकारच्या फुलपाखरु देखील बगडतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या प्रगतीब फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर १५-२० दिवसांनी रंग बदलत असल्याचे दिसते.

वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात. तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे कास पठार हे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल. गेल्या काही वर्षांपासून हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. कास पठाराला हंगामात दररोज तीन हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या