25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रखा. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध

खा. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध

एकमत ऑनलाईन

तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचा दावा
मुंबई : पत्राचाळ आर्थिक घोटाळ््यात अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने विरोध केला आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळ््यात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे आहेत, असा दावा ईडीने आज विशेष कोर्टात केला. सध्या या प्रकरणाचा तपास अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे ईडीने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ईडी कोठडीनंतर सध्या संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जाला आज ईडीने विरोध केला. ईडीने कोर्टाला सांगितले की, पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन देऊ नये.

१०३९ कोटी ७९ लाखांच्या पत्राचाळ घोटाळ््याचा तपास सध्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर असल्याचे ईडीने सांगितले. याआधीदेखील ८ ऑगस्ट रोजी ईडीने कोर्टात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे सांगितले होते. ईडीला या प्रकरणात अधिक सखोल तपास करायचा असल्याचे सांगितले होते. पत्राचाळ प्रकरणातील या आर्थिक गैरव्यवहारात १ कोटी ६ लाख आणि १ कोटी १७ लाख ही रक्कम मिळाल्याचे पुरावे आहेत. मात्र, ही रक्कम संशयास्पद असल्याचा ईडीचा दावा आहे.

पत्नीच्या खात्यातील
व्यवहार संशयास्पद
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील १ कोटी ८ लाखांचा व्यवहारदेखील संशयास्पद असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. अशाच प्रकारे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले आहेत. या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडीला करायचा असल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे राऊतांना जामीन देऊ नये, असे ईडीने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या