22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रकळवा पुलावरून खा. शिंदे-आव्हाडांमध्ये शाब्दिक वॉर

कळवा पुलावरून खा. शिंदे-आव्हाडांमध्ये शाब्दिक वॉर

एकमत ऑनलाईन

ठाणे : कळवा येथील पुलावरून मुख्यमंत्री शिंदेंसोबत शाब्दीक वॉर रंगले. त्यानंतर भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शाब्दिक युद्ध रंगले असतानाच मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांना टपली मारली आणि दोघांत हास्यविनोदही झाला. यावरून ते त्यांच्यातील मैत्रीचे बंध कायम असल्याचे दिसून आले.

कळवा पुलाच्या श्रेयवादावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि आव्हाड यांच्यात चांगल्याच शाब्दीक ठिणग्या उडाल्या. बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे म्हणत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते, तर मुख्यमंत्र्यांनी कौन किसके शादी मै आयेगा असे उत्तर देत आव्हाडांनाही आव्हान दिले होते. रविवारी ठाण्यातील कळवा पुलाच्या उद्घाटन सोहळ््याला मुख्यमंत्री शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर होते. या सोहळ््यात शिंदे-आव्हाडांनी एकमेकांना कोपरखळ््या लगावल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. आव्हाड बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना टपली लगावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही जनतेचे काम करणारे आहोत. ज्यात लोकांचा फायदा तेच काम आपल्याला करायचे आहे.

जितेंद्र आव्हाडांनी पुलाच्या कामावरून मुख्यमंत्र्यांना दोन गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. आव्हाड म्हणाले की, दोन प्रमुख मागण्या आम्ही पूर्वीपासून करतो आहोत. कळव्यात उतरतो तिथून लेफ्ट टर्न घेऊन ८ लेनचा हायवे येतो. त्याला जॉईन केला, तर टोलनाक्यापर्यंत रस्ता चांगला होईल. यामुळे जे कळव्यात, खारेगावला जाणारी आहेत ती इथून जाणार नाहीत. कळव्याची वाहतूक कोंडी कमी होईल व पर्यायाने वाहतुकीची समस्या सुटू शकेल. ही विनंती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५ वर्षांपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनाही विनंती करतो.

अडीच वर्षे काय केले? : श्रीकांत शिंदे
फडणवीस आणि शिंदे सरकार यांना विनंती केली असे आव्हाड जेव्हा म्हणाले, त्यादरम्यान मविआ सत्तेत होती. हा धागा पकडून खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, अडीच वर्षे सरकारमध्ये असताना काय केले. खासदार शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देता आव्हाड म्हणाले की, अडीच वर्षे कोविडमध्ये होती ना. यावर स्टेजवर एकच हशा पिकला.

तेव्हा मारली टपली
हाच मुद्दा पुढे सरकवत आव्हाड म्हणाले की, हा विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. बोलायला लावू नका, हे ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांना टपली मारली. यामुळे व्यासपीठावर पुन्हा चांगलाच हशा पिकला अन् तेव्हाच मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाडांना टपली मारली. यामुळे उपस्थितांनाही आव्हाड आणि शिंदे यांच्यातील मैत्री अंदर की बात हैचा प्रत्यय आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या