22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रखा. कोल्हे म्हणाले नाराजीचा प्रश्न येतोच कुठे?

खा. कोल्हे म्हणाले नाराजीचा प्रश्न येतोच कुठे?

एकमत ऑनलाईन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण नाराज असण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मी कोणत्याही कारणास्तव नाराज नाही. मी नाराज असेल तर थेट शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलू शकतो. त्यामुळे नाराज नाही, याचा पुनरुच्चार करीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत, असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. यात नाराजीचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेत्यांचा उल्लेख आहे. त्या यादीत कोल्हे यांचे नाव नसल्याने आणि त्यांच्या नाराजीबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरामध्ये आपल्या दातांच्या समस्येमुळे गैरहजर होतो. त्याशिवाय गुजरातच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आपण नाही. ती यादी तयार करणे माझ्या हातात कुठे? दिल्ली ऑफिसमधून ही यादी तयार झाली. तो त्यांचा निर्णय आहे,’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या, असे विचारता, ‘आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. आपली कोणतीही नाराजी नाही. नाराजी असण्याचे कारण नाही. शिवनेरीवर भगवा ध्वज लावावा. तो आतापर्यंत लावण्यात आला नाही. शिवनेरीवर रोप वे करण्यात यावे अशी मागणी शहा यांच्याकडे भेटी दरम्यान केली.’ असे कोल्हेंनी सांगितले.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या