33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी !

एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) पुण्यातील भोसरी जमिन प्रकरणी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी कडून साडेसहा तास चौकशी करण्यात आली.या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आपण ईडीला दिली असून त्‍यांच्या सर्व प्रश्नांची उत्‍त्‍रे आपण दिली आहेत. यापुढेही ईडीला या प्रकरणाच्या तपासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहणार आहे.आपल्‍यावर कोणाचाही दबाव नसल्‍याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी चौकशीनंतर प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पुण्यातील भोसरी जमिन प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स एकनाथ खडसेंना डिसेंबर महिन्यातच बजावण्यात आले होते.मात्र त्‍यावेळी त्‍यांना कोरोना झाल्‍याचे निष्‍पन्न झाल्‍याने चौकशी टळली होती.आता शुक्रवारी सकाळी त्‍यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.एकनाथ खडसे सकाळी साडेअकराच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले.त्‍यानंतर तब्‍बल साडेसहा तास त्‍यांची चौकशी सुरू होती.

त्‍यानंतर संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास खडसे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्‍हणाले,ईडीला आपण चौकशीत सर्व सहकार्य करणार आहे.ईडी जेव्हा काही कागदपत्रे मागेल ती आपण देउ,तपासासाठी बोलावेल तरीही हजर राहू.याआधी भोसरी जमिन प्रकरणाची चार वेळा चौकशी झाली आहे.दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,इन्कम टॅक्‍स,झोटिंग समिती आणि आता ईडी अशी चौकशी झाली आहे.त्‍यांच्या सर्व प्रश्नांची आपण उत्‍तरे दिली आहेत.यापुढेही ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्‍तरे देउ.आपल्‍यावर कोणाचाही दबाव नसल्‍याचेही खडसे म्‍हणाले.ईडीने परत बोलावलेले नसल्‍याचेही खडसे म्‍हणाले.

दरम्‍यान,भोसरी जमिन खरेदी प्रकरणापासूनच एकनाथ खडसे यांच्या मागे ससेमिरा सुरू झाला.त्‍यांना तत्‍कालीन फडणवीस सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामाही दयावा लागला.कालांतराने खडसेंनी भाजपाला सोडचिठठी देत राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.तेव्हाच खडसे यांनी आपल्‍यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता वर्तविली होती. ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशाराही दिला होता

लस का घ्यायची?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या