26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआता अडीच वर्षे ईडीच्या कार्यालयाला कुलूप लागणार : छगन भुजबळ

आता अडीच वर्षे ईडीच्या कार्यालयाला कुलूप लागणार : छगन भुजबळ

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यात जे काही कांड झाले त्यामागे ईडी असून अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचे सरकार आले आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावला. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाले असतील, आता दिल्लीला गेलो आणि सुटलो रे बाबा असेही भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचे सरकार आले आहे. राज्यात जे काही कांड झाले. सत्तांतर झाले त्यामागे ईडी आहे. महाराष्ट्र सदनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्यात आले. पण त्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. आता आपल्यातल्या काही मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाल्या, आम्ही दिल्लीला गेलो, आता सुटलो, आमच्या केसेस माफ झाल्या.

आमच्यावर आरोप करताय, पण मला या आरोपांचे आता काहीही वाटत नाही असं म्हणज छगन भुजबळ यांनी शायरीच्या माध्यमातून आपली भावना मांडली. ते म्हणाले की, बडी से बडी हस्ती मिट गयी हमे मिटाने मे, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बित जायेगी हमे मिटाने मे.

नरहरी झिरवाळ यांची टोलेबाजी
शिवसेनेची आताची अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झाली आहे असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटले. ११ तारखेला काय होईल हे मलाही सांगता येत नाही पण कायद्याप्रमाणे माझा निर्णय योग्य होता असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या