36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रईडीने जप्त केली १९१ कोटींची इमारत

ईडीने जप्त केली १९१ कोटींची इमारत

एकमत ऑनलाईन

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडिंग कायदा अंतर्गत मुंबईत १९१ कोटी रुपयांची निवासी इमारत जप्त केली. ही इमारत मुंबईच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असणा-या वरळी भागात आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार ही कारवाई भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड संबंधित एका बँक फ्रॉड प्रकरणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ४४२० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

२०१९ पासून ईडी याप्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयच्या एका तक्रारीनंतर झाली होती. ईडीने याप्रकरणात मनी लाँड्रिंगबाबत तपास सुरू केला. या कंपनीचे प्रमोटर बँकेची फसवणूक करण्याच्या प्रकरणात सहभागी होते, असा सीबीआयने आरोप केला होता. याप्रकरणी एजन्सीने एक चार्जशीटदेखील दाखल केले होते. त्यानुसार बीपीएसएलचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संजय सिंंघल यांच्यासह २५ जण आरोपी होते.

बँकेकडून घेतलेल्या कर्जामधील हा फ्रॉड समोर आला आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर बीपीएसएलने डिफॉल्ट केले आहे. या प्रकरणी खात्यांमध्ये घोटाळा झाला आणि कंपनीच्या संचालकांनी बनावट कंपन्यांच्या आधारे फसवणूक करून पैसे डायव्हर्ट केले आहेत. सीबीआयने एका अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, बीपीएसएलने विविध बँकांकडून घेतलेली कर्जाच्या स्वरुपातील रक्कम हस्तगत करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. दरम्यान ईडीचे असे म्हणणे आहे की, मुंबईतील जी इमारत आज जप्त करण्यात आली आहे तीदेखील खात्यांमध्ये हेराफेरी करून खरेदी करण्यात आली होती.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या