23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रईडी म्हणजे केंद्र सरकारचे कुत्रे, पळ म्हटले की पळते

ईडी म्हणजे केंद्र सरकारचे कुत्रे, पळ म्हटले की पळते

एकमत ऑनलाईन

मुंबई : ईडी हे केंद्र सरकारचे कुत्रे असून कुणाला चावायचे आणि कुणाला नाही हे त्याला सांगितले जाते. ईडी चावण्याची भीती दाखवून भाजप आपल्याकडे नेत्यांना वळवून घेत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून ईडीविरोधात आक्रमक आंदोलने केली जात आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज बुधवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. नवी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पटोले यांनी ही टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, केंद्र सरकारची दादागिरी सुरू आहे. इंग्रजांच्या अत्याचाराप्रमाणे भाजप सरकारचा देशात अत्याचार सुरू आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून केंद्र सरकारविरोधात आम्ही लढत राहणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

राज्यात काँग्रेसचे ईडीविरोधात आंदोलन
देशभर आंदोलन सुरू असतानाच मुंबईत युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. बोरिवली स्टेशनवर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू असून, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूरमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
काँग्रेसने ईडी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन सुरू केले आहे. काल नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली होती. त्यानंतर आज नागपूर पोलिसांनी इडी कार्यालयासमोर चोख सुरक्षा व्यवस्था लावली आहे. बॅरीकेटिंग करून ईडी कार्यालय असलेल्या सीजीओ कॉम्प्लेक्स परिसराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या