23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रयशवंत जाधवांना ईडीकडून समन्स

यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : बेनामी संपत्तीप्रकरणी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर गेले काही दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यामागे आता ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. ईडीच्या समन्समुळे जाधवांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यशवंत जाधव यांना फेमा कायद्यांतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि आयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यात त्यांच्या बेनामी कंपनीचीही चौकशी करण्यात आली आहे. यात मोठी रक्कम निकटवर्तीयांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. याबाबत आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

६ कोटींच्या दागिन्याचे रोख व्यवहार
गेली अनेक दिवस आयकर विभागाकडून जाधवांची चौकशी सुरू आहे. यात त्यांच्या मालमत्तांची यादी वाढतच गेली आहे. ३५वरून मालमत्तांचा आकडा ५३ वर गेला आहे. यात कैसर बिल्डिंगचाही समावेश आहे, केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठी या मालमत्तांची खरेदी करण्यात आली आहे, असे चौकशीत दिसत असल्याचा अंदाज आहे. या एका इमारतीमधून जवळपास ८० कोटी रुपये पांढरे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातच काही ज्लेलर्सकडून तब्बल ६ कोटींचे दागिने विकत घेतल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या याआधीच ४१ मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून या मालमत्तेवर टाच आली आहे. यामध्ये त्यांच्या वांद्र्यातील ५ कोटींच्या फ्लॅटचा समावेश आहे. २५ फेब्रुवारीला आयकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या या तपासादरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या