19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रएबीजी शिपयार्डवर ‘ईडी’च्या धाडी ; बँंकांमध्ये २२ हजार कोटींचा घोटाळा

एबीजी शिपयार्डवर ‘ईडी’च्या धाडी ; बँंकांमध्ये २२ हजार कोटींचा घोटाळा

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशातील सर्वांत मोठा बँक घोटाळा केलेल्या एबीजी शिपयार्ड कंपनीच्या कार्यालयांवर आज मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने धाडी घातल्या आहेत. एबीजी शिपयार्डच्या मुंबई, पुणे आणि सुरतमधील जवळपास २४ कार्यालयांवर आणि संचालकांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची तपास पथके धडकली आहेत. कर्जासंबंधीच्या महत्त्वाच्या दस्तांचा तपास केला जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

मनी लाँड्रिंगसंबंधीच्या ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत ईडीकडून ही तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी ‘सीबीआय’ने फेब्रुवारी महिन्यात बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आज ईडीकडून २४ ठिकाणी तपास केला जात आहे. यात ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर संचालकांच्या घरी देखील तपास पथके पोहोचली असून तपास केला जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

देशातील बँकिंग क्षेत्रातील आजवरचा हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. एबीजी शिपयार्डने २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केली. ज्यात स्टेट बँकेकडून २ हजार ९२५ कोटी, आयसीआयसीआय बँकेकडून ७ हजार ८९ कोटी, आयडीबीआय बँकेकडून ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाकडून १ हजार ६१४ कोटी, पीएनबीकडून १ हजार २४४ कोटी आणि आयओबीकडून १ हजार २२८ कोटी इतके कर्ज एबीजी शिपयार्डने घेतले आहे.

एबीजी शिपयार्डचा कर्ज घोटाळा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून २२,८४२ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात नुकताच खटला दाखल करण्यात आला. सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने एबीजी शिपयार्ड कंपनी तसेच कंपनीच्या संचालकांविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर जारी केले होते. एबीजी शिपयार्ड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे या कंपनीचे प्रमुख प्लांट आहेत.

कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील २८ बड्या बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा गंडा घातला आहे. या कंपनीने कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम अन्यत्र वळवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या