29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न - अनिल परब

एसटी कर्मचा-यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न – अनिल परब

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे परब यांनी म्हटले आहे़

सध्या राज्यातील बसेस राज्याच्या बाहेर जात नाहीत. तसेच बाहेरच्या बसेस राज्यात येत नाहीत. तरीही परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला जातोय. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील, असे अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचा-यांना कोरोनाचा धोका
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचा-यांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती परब यांनी दिली.एसटी कर्मचा-यांचे लसीकरण व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत काम करणा-यांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. जे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत; त्यांची दाखल घेण्यात आली आहे. एसटी कर्मचा-यांना मदतीचा हात कसा देता येईल तसेच त्यांना संसर्ग कसा होणार नाही याबाबत आम्ही नक्की उपाययोजना करणार,असे परब म्हणाले.

कुंभमेळ्यावरून आलेल्यांना विलगीकरणात ठेवणार
कुंभमेळ्यामध्ये मोठा संसर्ग झाला आहे. येथील लोक सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. कुंभमेळ्याहून परतणा-या लोकांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तशा सूचना नाशिकच्या जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत,असे परब यांनी सांगितले.

बंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या