30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंच्या गाडीचा अपघात; खडसे सुखरुप

एकनाथ खडसेंच्या गाडीचा अपघात; खडसे सुखरुप

एकमत ऑनलाईन

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजता धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. या दौºयात अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते. अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच १९ सीई १९) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते.

धरणगावपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या