मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून ११ लाखांची रोकड सापडली आहे. पण, यापैकी १० लाखांची रक्कम असलेल्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची माहिती समोर आली. पण, आम्ही अयोध्या दौ-याला गेलो होतो. या पाकिटांबद्दल माहिती घेत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे. राऊतांच्या भांडुप येथील घरातून ईडीने ११ लाखांची रोकड जप्त केली आहे. या ११ लाखांपैकी १० लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची माहिती समोर आली.
ईडीने राऊत यांच्या मैत्री या निवास्थानातून साडे ११ लाखांची रोकड जप्त केली. यापैकी १० लाख रुपये असलेल्या पाकिटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याचे समोर आले आहे. या रक्कमेवर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असा उल्लेख या पाकिटांवर होता. याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही अयोध्या दौ-याला गेलो होतो. अयोध्या हा आमचा भावनेचा विषय आहे, त्या पाकिटांवर माझे नाव का आहे, याची माहिती नाही. आता त्याची माहिती घ्यावी लागेल, असा खुलासा शिंदे यांनी केला.