24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रसहाव्या जागेसाठी १० जूनला निवडणूक

सहाव्या जागेसाठी १० जूनला निवडणूक

एकमत ऑनलाईन

मुंबई: भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही माघार न घेतल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना ंिरगणात उतरवले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी कालपासून प्रयत्नशील होती.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेटही घेतली होती. त्यावेळी महाविकास आघाडीने फडणवीस यांच्यासमोर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुपारी मुदत संपेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता १० जून रोजी सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत होणे निश्चित आहे.

आम्ही निवडणुकीला घाबरत नाही: संजय राऊत
राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाष्य केले. या निवडणुकीत सामोपचाराने मार्ग निघाला असता तर आम्हाला हवे होते. आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आता निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जाणे आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणणे, ही आमची जबाबदारी आहे. महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या