24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या तिस-या गुणवत्ता यादीमध्ये मुंबई विभागातून ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिस-या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून १ लाख १९ हजार १७१ जागा उपलब्ध होत्या. त्यातील १ लाख १६ हजार ८० जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तिस-या गुणवत्ता यादीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थी १८ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करु शकणार आहेत.

अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार १७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ८ हजार ८६ विद्यार्थ्यांना दुस-या पसंतीचे, ६ हजार ८३७ विद्यार्थ्यांना तिस-या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ५७ तर पाचव्या पसंतीचे महाविद्यलय मिळालेल्याची संख्या ५ हजार १७३ इतकी आहे.

विशेष म्हणजे तिस-या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार ३६६ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या १२८९ तर सीबीएसईच्या ११३६ विद्यार्थ्यांचा तिस-या गुणवत्ता यादीत समावेश आहे.

तिसरी फेरी
कला – एकूण शिल्लक जागा १४,५५७ – कॉलेज मिळालेले विद्यार्थी ३९०८
वाणिज्य- एकूण शिल्लक जागा – ६३,३५९ कॉलेज मिळालेले विद्यार्थी- २८,८३९
विज्ञान- एकूण शिल्लक जागा ३८,८६९ – कॉलेज मिळालेले विद्यार्थी -१२,५५३
एकूण शिल्लक जागा- १,१९,१७१ तिस-या फेरीत कॉलेज मिळलले विद्यार्थी – ४५,४०२

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे कॅनडाच्या पंतप्रधानांना भोवलं?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या