22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन व्यवस्थापन बैठक

मुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन व्यवस्थापन बैठक

एकमत ऑनलाईन

ठाणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक बुधवारी (ता. ६) पार पडली. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना विविध सूचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत अधिका-यांना क्षेत्रीय स्तरावर काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अधिका-यांनी फिल्डवर जाऊन काम केले तर चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळा सुरू झाला आहे. तेव्हा रस्त्यांवरील खड्डे लक्षपूर्वक भरा. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणीही जखमी होऊ नये याची दक्षता घ्या. कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवा. पूर येणा-या भागात जीवितहानी होऊ नये याची दक्षता घ्या. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा आणि आवश्यकता पडल्यास वेळेत हलवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिका-यांना दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या