27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रकर्मचा-यांना दोन दिवसांत तिन्ही महिन्यांचे वेतन

कर्मचा-यांना दोन दिवसांत तिन्ही महिन्यांचे वेतन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी दिले जाणार असल्याची घोषणा मंगळवार दि़ १० नोव्हेंबर रोजी केल्यामुळे अखेर एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.

आज परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत बैठक झाली. राज्य सरकारने या बैठकीत परिवहन महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एसटी कर्मचा-यांचे पगार देणे शक्य होणार आहे. याबाबत अनिल परब म्हणाले की, एसटीच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न खूप गंभीर होता. कोरोनामुळे झालेली महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणे कठीण होते. वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. गेल्या तीन महिन्याचे एसटी कर्मचा-यांचे वेतन थकित होते. त्यापैकी एका महिन्याचा पगार दिवाळीसाठी काल देण्यात आला.

एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर
आज यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. नेहमी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न उभा होतो, म्हणून आज अजित पवारांकडे मी सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केल्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. दिवाळीपूर्वी कर्मचा-यांना तिन्ही महिन्याचे वेतन देणार आहोत. याबाबतची फाईल आज पुढे पाठवली असून कर्मचा-यांना दोन दिवसात पगार मिळेल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

देशाला मोठ्या नैसर्गिक संकटाचा धोका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या