22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणात शिवसेना नेते आणि मुंबई पोलिस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्माला गुरूवार दि़ १७ जून रोजी एनआयएने अटक केली.

सकाळपासून एनआयने त्याच्या मुंबईतील घरात छापा मारला होता आणि शोधमोहिम सुरू होती. तशातच दुपारच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. प्रदीप शर्माने गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रदीप शर्मा याला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. मनसुख प्रकरणात प्रदीप शर्मा यांना एनआयएने आधी एक-दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र आज सकाळी अचानकच प्रदीप शर्माच्या मुंबईतील अंधेरी येथील घरावर एनआयएने छापा टाकला. यावेळी काही महत्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आणि म्हणूनच प्रदीप शर्माला अटक करण्यात आल्याची चर्चा आहे. गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रदीप शर्मावर करण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी औषध, उपकरणांचा पुरेसा साठा ठेवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या