22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रएन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची तुरुंगात तब्येत बिघडली

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची तुरुंगात तब्येत बिघडली

एकमत ऑनलाईन

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली आहे. प्रदीप शर्मा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रदीप शर्मा यांच्या पोटात गेल्या १२-१५ दिवसांपूर्वी पोटात दुखत असल्यामुळे त्यांना ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी शर्मा हे सध्या ससूनमध्ये आहेत. अँन्टिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एन्काऊटंर स्पेशलिस्ट अशी प्रदीप शर्माची ओळख आहे. मुंबई पोलिस दलातील कार्यरत असताना त्यांच्यावर आतापर्यंत ११३ एन्काऊटंरची नोंद आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मधून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या