25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रसरपंच, नगराध्यक्षांची जनतेतून निवड केल्याने सत्ता केंद्रीत होते : अजित पवार

सरपंच, नगराध्यक्षांची जनतेतून निवड केल्याने सत्ता केंद्रीत होते : अजित पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई – बाजार समितीत शेतक-यांना संधी दिली त्यात दुमत असू शकत नाही. मात्र मार्केट कमिट्यांना निवडणुकीचा खर्च करावा लागतो. एवढा मोठा खर्च मार्केट कमिट्या पेलवू शकणार नाही. तुम्ही नगराध्यक्ष, सरपंच थेट करता मग तुम्ही मुख्यमंत्री थेट करा, राष्ट्रपती थेट करा, पंचायतसमिती सभापती थेट करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार कडाडून टीका केली.

सगळ्या नागरिकांनी मतदान करून राष्ट्रपतींची निवडणूक घ्या, असे म्हणत अजित पवार यांनी इतिहासातील संदर्भ दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांनी केली. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. पंतप्रधानांची निवड खासदारांकडून होती. मुख्यमंत्र्यांची निवड आमदारांकडून होते. तशीच पद्धत नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ठेवली असती तर चांगले झाले असते असेही अजित पवार यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याच्या त्रुटी सांगितल्या. ते म्हणाले की, सरपंच एका विचाराचा होतो आणि खालची बॉडी वेगळ्या विचाराची होती. नगराधअयक्षाच्या बाबतीत असच होते. त्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही. शिवाय सत्ता एका व्यक्तीच्या हातात केंद्रीत होते. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या