22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रचौकशीसाठी एसआयटीची स्थापना?

चौकशीसाठी एसआयटीची स्थापना?

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलात हालचालींना वेग आला. वानखेडेंविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ५ तक्रारी दाखल आहेत. यासंबंधीच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याची तयारी केली आहे. पुढील २४ तासांत यासंबंधी घोषणा होऊ शकते.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींचा डील करण्याच्या आरोपासोबतच बरेच आरोप करण्यात आले आहेत. त्यातच राज्यातील मंत्री नवाब मलिक हे रोजच नवा गौप्यस्फोट करून समीर वानखेडे यांच्यासंदर्भात ब-याच गोष्टी समोर आणत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. अगोदरच त्यांची एनसीबीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. त्यात आता राज्य सरकारही एसआयटीची स्थापना करून त्यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गोसावी लखनौमधून फरार
आर्यन खान प्रकरणातील फरार असलेला पंच किरण गोसावी आता पसार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. फरार किरण गोसावी उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे लपून बसला होता. तो पोलिसांना शरण येणार होता. पण पुणे पोलिस लखनौला पोहोचण्याआधीच तो तिथून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

प्रभाकर साईलला समन्स
समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे पथक बुधवारी मुंबईत येत आहे. या पार्श्वभूमीवर क्रूझ रेव्ह पार्टीतील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईलला एनसीबीने समन्स बजावले असून, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. साईलने वानखेडेंवर २५ कोटींच्या डीलचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याची चौकशी केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या