पुणे : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या वतीने देशातील पश्चिम भागातील सहा महामार्गांवर ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन्स सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पुणे-अहमदनगर-औरंगाबाद, पुणे- सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, मुंबई-नाशिक आणि नाशिक-शिर्डी या मार्गावर ही सुविधा असणार आहे.
बीपीसीएल फ्युएल स्टेशन्सवरील ईव्ही फास्ट चार्जर्स केवळ ३० मिनिटांत ईव्ही रिचार्ज करत असल्यामुळे १२५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते व पर्यायाने महामार्गावरील अशा दोन सुविधांवरील अंतर १०० कि.मी.च्या आत ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत बीपीसीएलने ६ महामार्गांचे इलेक्ट्रिक कॉरिडॉर्समध्ये रुपांतर केले असून ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० महामार्गांवर इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग कॉरिडॉर्स क्लीन.फास्ट.ईझी अशी टॅगलाईन असलेल्या ईड्राईव्ह ब्रँडअंतर्गत उभारले जाणार आहेत. बीपीसीएलतर्फे उभारण्यात येत असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचा हा सहावा आणि पश्चिम भागातील पहिला टप्पा आहे.