25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्र१० वर्षांपूर्वीही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना केली मदत

१० वर्षांपूर्वीही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना केली मदत

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे गट मनसेसोबत जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे- राज ठाकरेंमध्ये फोनद्वारे बोलणे झाल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले.

मात्र, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. १० वर्षांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले होते. विशेष म्हणजे या भेटीमुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.

२०१२ मधील महापालिका निवडणुकीत १३० जागा असलेल्या ठाण्यात शिवसेनेला ५३ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजपाला ८ आणि आरपीआयला एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि आरपीआय अशी महायुती होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला ३४ आणि काँग्रेसला १८ जागांवर विजय मिळाला होता. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात, बहुजन समाज पक्षाला दोन तर अपक्ष ७ नगरसेवक निवडून आले होते. युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता.

त्यामुळे मनसे, बसपा आणि अपक्ष नगरसेवक किंगमेकर ठरणार होते. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो तर एकनाथ शिंदे या बालेकिल्ल्याचे किंग म्हणून ओळखले जातात. या बालेकिल्ल्यात शिंदेशाहीसमोर आव्हान निर्माण झाले होते.

निकाल समोर येताच एकनाथ शिंदे हे कामाला लागले. भाजपाची सत्ता आल्यापासून आमदारांचा हॉटेल मुक्काम चर्चेत असला तरी ठाणेकरांना लोकप्रतिनिधींचे ‘नॉट रिचेबल’ होणे हे एकनाथ शिंदेमुळे समजले. एकनाथ शिंदेंनी त्यावेळी ठाण्यातील बहुजन समाज पक्षाचे दोन नगरसेवक रातोरात अज्ञातस्थळी नेले. या नगरसेवकांचे अपहरण झाल्याची तक्रार जितेंद्र आव्हाडांनी करायला लावली होती. आता शिवसेनेसमोर मनसे आणि अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान होते.

एकनाथ शिंदेंनी त्यावेळी थेट राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज गाठले. या भेटीनंतर राज ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि ठाण्याचा गड शिवसेनेने राखला. गेल्या १० वर्षांत राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना-भाजपा यांची युती तुटली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने शिवसेना राज्यात सत्तेवर आहे. पण उद्धव ठाकरे-ठाकरे यांच्यातील दुरावा कायम आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे आणि प्रताप सरनाईक हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. राजकीय मतभेदांऐवजी जनहिताला प्राधान्य द्यावे, असे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले, त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतोय, असे राज ठाकरेंनी सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या