24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रवर्षभरानंतरही सुशांतसिंहच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात सीबीआय अयशस्वी

वर्षभरानंतरही सुशांतसिंहच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात सीबीआय अयशस्वी

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. १४(प्रतिनिधी)- अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष झाले. परंतु आजपर्यंत सुशांतच्या बाबतीत सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत आलेली नाही. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच सुशांतसिंग प्रकरणाचा गैरवापर भाजपने केला असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी आज केला.

सुशांतची हत्या की आत्महत्या याचा तपास करणाऱ्या सीबीआय चौकशीला आज ३१० दिवस व एम्स पॅनेलने सुशांतच्या हत्येचा मुद्दा निकाली काढला त्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल ? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे असे सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत. सीबीआयवर दिल्लीतील राजकीय वरिष्ठांचा प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

ड्रग्ज कनेक्शन कुठपर्यंत ?
सुशांतसिंगने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासातून स्पष्ट केले होते. सुप्रीम कोर्टानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता असे म्हटले आहे. असे असतानाही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपने सुशांतसिंगच्या आत्महत्येला राजकीय रंग देत त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला होता. सुशांतसिंग प्रकरणात ड्रग कनेक्शनही उघड झाले होते त्याचे धागेदोरे भाजपच्या अत्यंत जवळच्या लोकांपर्यंत असल्याचे आम्ही पुराव्यानिशी वारंवार उघड केले परंतु सीबीआय अथवा एनसीबीने त्याचा छडा लावला नाही असे ते म्हणाले.

अँटिलियाचा मास्टरमांईंड मोकाट
अँटिलीया प्रकरणातही एनआयए मास्टरमाईंडपर्यंत अजून पोहचलेली नाही. अँटिलीया कट रचणारे बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते व परमबीर सिंग यांच्या थेट हाताखाली काम करत होते असे असतानाही एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही, मास्टरमाईंडला संरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा त्याच्याशी काही गुप्त करार झाला आहे का? परमबीरसिंग यांची चौकशी का होत नाही?

एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही? जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु सत्य लपवता येत नाही अखेर सत्याचाच विजय होतो हे लक्षात ठेवा, असेही सावंत म्हणाले.

कोरोना पॉझिटिव्हचा आकडा पुन्हा शंभरी पार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या