18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रआजही वाटते की, मी मुख्यमंत्री आहे!

आजही वाटते की, मी मुख्यमंत्री आहे!

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘मला आजही असं वाटतं आहे की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.’ फडणवीसांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘आपल्या सगळ्या भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावे. चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्या, यासाठी अनेक योजना आपल्या काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आहे की आज भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या कामामुळे महिलांना मोठा फायदा होईल.

‘गणेश नाईक असतील, भाजप आमदार मंदा म्हात्रे असाल, पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवले नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही.’असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदही तितकेच मोठे
‘दोन वर्षे फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं’ असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्षे होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केले पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढले पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठे आहे. ते पद मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळले पाहिजे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या