22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रचहापाणी न देताही लोक निवडून देतील

चहापाणी न देताही लोक निवडून देतील

एकमत ऑनलाईन

मुंबई : आपल्या मोकळ््या-ढाकळ््या बोलण्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी पुढील निवडणुकीत मी माझे पोस्टरही लावणार नाही. कोणाला चहा-पाणी देणार नाही. मत द्यायचे असेल, तर द्या, नाही तर नका देऊ, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच लोक चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. त्यामुळे लोक मला नक्की निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरन्मेंटच्या दीक्षांत समारंभात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गडकरींचे वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. गडकरी म्हणाले की, मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, मी कधी स्वत:चे कटआऊट लावत नाही व दुस-याचेही लावत नाही. तरीदेखील मी निवडून नाही आलो का, आता तर पुढच्या निवडणुकीत मी ठरवले आहे. माझे नाव लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी पोस्टरच लावणार नाही. कोणाला चहा-पाणीही देणार नाही. तुम्हाला मत द्यायची तर द्या, नाहीतर नका देऊ, असे म्हटले.

विशेष म्हणजे मी पोस्टर लावले नाही, चहा-पाणी दिले नाही तरी लोक मला मते देतील. कारण निवडणुकीत लोकच मायबाप असतात. लोकांनाही चांगले काम करणारे, चांगली माणसे हवी असतात. मी एवढ्या वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, आतापर्यंत मी कोणाच्या गळ््यात हार घातला नाही. माझ्या स्वागतासाठी एकही माणूस येत नाही. मला निरोप द्यायलाही कुणी येत नाही. चांगले काम करत असाल तर त्याची आवश्यकताही नाही, असेही गडकरी म्हणाले.

नगरसेवकांसाठी सिलॅबस तयार करा
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरन्मेंट संस्थेला उद्देशून बोलताना गडकरी यांनी चांगल्या लोकांना प्रशिक्षण द्या. गुणात्मक परिवर्तन करण्याची जबाबदारी तुमची आहे. मी भाजप अध्यक्ष असताना खासदार, आमदारांसाठी एक सिलॅबस तयार केला होता, असे गडकरी म्हणाले.

लोक खिशातून पैसे काढतील
लोकांना चांगली सेवा दिली तर लोक खिशातून पैसे देतील. त्यामुळे चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत गडकरींनी व्यक्त केले. मुंबई-पुणे महामार्ग बांधला तेव्हा टोलच्या नावाने ओरड सुरू झाली. मात्र, वाहतुकीची गैरसोय दूर झाली, तेव्हा लोकांनी ते स्वीकारले, असेही गडकरी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या