25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रप्रत्येक रविवारी आरे कारशेडविरोधात आवाज उठवणार; आंदोलकांकडून पुन्हा आंदोलन

प्रत्येक रविवारी आरे कारशेडविरोधात आवाज उठवणार; आंदोलकांकडून पुन्हा आंदोलन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आरे कारशेडविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही प्रत्येक रविवारी आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने कारशेडला स्थगिती दिली होती पण भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्याकडून स्थगिती उठवण्यात आल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन आहे. कोणत्याही परिस्थितीत आरे जंगल वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.

आरे जंगल वाचले पाहिजे, आरेला जंगल घोषित करा. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि कारशेडचे काम थांबणार नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन करणार असल्याचा पवित्रा पर्यावरणवाद्यांनी घेतला आहे. दरम्यान मागच्या वेळी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आरे वाचवा या मोहिमेमध्ये सामील झाले होते. त्यांच्यासोबत अनेक लहान मुलेही मोहिमेत सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या