34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रनववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द

एकमत ऑनलाईन

मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्ग नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता, तर दुसरीकडे निर्बंध, कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात, अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होता.

गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर विभागाने विविध घटकांची मते जाणून घेतली. त्यावेळी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात?
गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केले. मात्र, यावर्षी परीक्षा न घेता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्यात
महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून वेळेवर परीक्षा घ्याव्यात, असा काही लोकांचा सूर आहे. आयसीआयसी, सीबीएससी व आयबी बोर्ड यांच्या परीक्षा वेळेवर होत आहेत. बोर्डाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी ग्रामीण भागात संगणक आणि इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी असा भेद न करता ऑफलाईन परीक्षा घ्यावी, अशी मागणी होत आहे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

अमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या