23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

राज्यात सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत. मात्र, गेली २ वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला होता. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली होती. मात्र या निर्णयाला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विद्यापीठाकडून याबाबत ठोस निर्णय झाला नव्हता.

त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. मात्र, या दरम्यान काही विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत वेगवेगळ््या विद्यापीठांच्या परीक्षा वेगवेगळ््या पद्धतीने होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करीत सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे आता सर्वत्र सारख्याच पद्धतीने परीक्षा होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रमही दूर झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या