27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रकृष्णाकाठी मृत माशांचा खच

कृष्णाकाठी मृत माशांचा खच

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागठाणे ते आमणापूर कृष्णा नदीच्या पात्रालगत लाखो मृत माशांचा खच पडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे. नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.

दरम्यान हे मासे पकडण्यासाठी सांगलीत नदीवर नागरिकांनी रात्री अंधारातही प्रचंड गर्दी केली होती. परंतु नदी पात्रात मृत झालेले मासे खाण्यासाठी धोकादायक असल्याने ते खाऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. याचाच फायदा घेत कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता तसेच सोडून दिले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे पाणी नदीत सर्वत्र पसरल्यानंतर लाखो मासे आणि खेकडे मृत्युमुखी पडले आहेत. परिणामी नदीकाठी मृत माशांचा आणि खेकड्यांचा खच पडला असून नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या