25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीसांकडूनही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा ; माजी मुख्यमंत्री म्हणूनच केला उल्लेख

फडणवीसांकडूनही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा ; माजी मुख्यमंत्री म्हणूनच केला उल्लेख

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो,’’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य तसेच देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे.

मात्र शुभेच्छा देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख ऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. एकीकडे शिंदेंच्या या ट्विटची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेना पक्ष संघटनेवरील वर्चस्वाच्या मुद्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक गट यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या