27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी मविआचा करेक्ट कार्यक्रम केला

फडणवीसांनी मविआचा करेक्ट कार्यक्रम केला

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीकडे भाजपपेक्षा जास्त आमदार असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे नेते मविआला हिणवताना दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपचे अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीला कोपरखळी मारली आहे. मविआ १७० वर आमचे १०६ भारी! फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. आमचे १०६ त्यांच्या १७० वर भारी! जय हो, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच ‘करेक्ट कार्यक्रम..अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणा-यांना दणदणीत उत्तर, असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

करेक्ट कार्यक्रम!
जयंत पाटील यांचा एक डायलॉग प्रचंड प्रसिद्ध आहे. एका जाहीर मुलाखतीत बोलताना त्यांनी योग्य वेळ पाहून आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, असे म्हटले होते. याच जयंत पाटलांच्या डायलॉगचा धागा धरत चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांसह राष्ट्रवादीला टोमणा लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या