24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यसभा निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत फडणवीस सकारात्मक

राज्यसभा निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत फडणवीस सकारात्मक

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

‘देवेंद्र फडणवीस व मी मित्र आहोत, हे तर आम्ही नेहमीच जगजाहीर सांगतो. त्यामुळे मित्राला मिठी मारायची नाही तर दुष्मनाला मारायची का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, याचा कोणताही राजकीय अर्थ घेऊ नये असे स्पष्ट करतानाच भाजप आणि काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. देशहितासाठी एकत्र येऊ शकतो पण राजकीय विचारसरणी कधीही एकत्र येऊ शकत नाही,’ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच, ‘राज्यसभेची पोटनिवडणूक लागत असेल तर ती बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यसभेची जागा ही काँग्रेसची होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेवरून ते निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत सकारात्मक होते,’असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार जो निर्णय घेईल तो मान्य
‘महापालिका निवडणुकीत प्रभाग दोनचे व्हावे ही मागणी काँग्रेसने केली आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे भूमिका देखील तीन आहेत. आम्ही मागणी केल्यानंतर सरकार काय निर्णय घेते ते पाहावे लागणार आहे. त्यानंतर सरकार लोकशाहीनुसार जो निर्णय घेईल तो मान्य असेल,’ असेही नाना पटोले म्हणाले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या