23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रबनावट नोटा हस्तगत

बनावट नोटा हस्तगत

एकमत ऑनलाईन

मुंबई : बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या एकूण ४० नोटा हस्तगत केल्या असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

घाटकोपरमधील सर्वोदय सिग्नल परिसरातील सेंट्रल बँकेजवळ एक इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या