अमरावती : शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यासाठी आतापर्यंत आपण निवडून पाठवलेले पक्षप्रतिनिधी बदल करू शकले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषदेत शेतक-यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य निवडून आल्याशिवाय आमदार, खासदारकीची वाट मोकळी होऊ शकणार नाही.
त्यामुळे शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे यांनी दिली.