नवी दिल्ली : सुरुवातीच्या काळात या आंदोलनात शेतकरी मोठ्याप्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्याप्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतक-यांच्या देखील हे लक्षात आले आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललेच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषि कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास, महिनाभरापेक्षाही अधिक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोनल सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने, केंद्र सरकार व शेतक-यांमधील चर्चांच्या बैठका निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, मला असे वाटत आहे की आता जर आपण दिल्लीचे आंदोलन बघितले. तर, डाव्या विचारसरणीचे लोकच त्यांचे नेतृत्व करत असल्याचे दिसत आहेत व अन्य काही वेगळी लोकं देखील आहेत. सुरुवातीच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतक-यांच्या देखील हे लक्षात आले आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललेच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू मला विश्वास आहे, केंद्र सरकार संपूर्ण चर्चा करत आहे. संवादातून प्रश्न सुटतात, त्यामुळे ते सुटतील. जे काही नेते आता बैठका करत आहेत किंवा याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झालाच, तरी फार तो यशस्वी होईल, असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले़
तिस-या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड