22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमनोर-विक्रमगड रस्त्यावर पालघर-अमळनेर एसटी बसला भीषण अपघात

मनोर-विक्रमगड रस्त्यावर पालघर-अमळनेर एसटी बसला भीषण अपघात

एकमत ऑनलाईन

पालघर : मनोर- विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्यावर आज(गुरुवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालघर – अमळनेर एसटी बस एका टेम्पो धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

पालघर वरून अमळनेरकडे जाणारी एसटी बस पालघर येथून सहा वाजता रवाना झाली होती. मनोर- विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्यावरून प्रवासी घेतल्यानंतर पुढे जाऊन बसचा ब्रेक दाबल्यानंतर निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून समोरून येणा-या टेम्पोला धडकली. या अपघातात बस चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त एसटी बसमध्ये विक्रमगडहून जव्हारच्या दिशेने जाणारे ३० प्रवासी होते. अपघातात जखमींमध्ये दयानंद (वय -५४), कैमूद्दीन शेख (वय झ्र ३१), धिरेंद्र यादव (वय-३२), राधेश्याम तिवारी (वय-३८), रवींद्र यादव (वय-४०) आणि एसटी बसचालक तवाब खान (वय-३२) यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या