27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १४ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १४ जण जखमी

एकमत ऑनलाईन

मुंबई : गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला.

टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण २२ प्रवासी होते. २२ प्रवाशांपैकी एकूण १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर आज पहाटे दोन वाजता अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईकडे जात असताना हमरापूर ब्रीजवर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला मागून धडकले.

या अपघातामध्ये एकूण १४ जण जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कल्पेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित जखमी लोकांना रुग्णवाहिकेतून तातडीने पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या