20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रवडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरेंसोबतच

वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरेंसोबतच

एकमत ऑनलाईन

मुंबई : गजानन कीर्तिकर जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत.

गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी हा माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील, असे म्हटले. दरम्यान, गजानन कीर्तीकर यांनी श्ािंदे गटात प्रवेश केल्यानंतर रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. आज मी शिंदे साहेबांसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते, पण चालवत पवार होते. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पदे दिली. अखेर सर्वांना बोलून एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणे गरजेचे आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतले. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे, असे गजानन कीर्तिकर म्हणाले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या