25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रफेवीपिरावीर बाजारात लॉन्च : किंमत प्रति गोळी 59 रुपये

फेवीपिरावीर बाजारात लॉन्च : किंमत प्रति गोळी 59 रुपये

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – औषध उत्पादक कंपनी हेटोरो यांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी कोरोनावरील उपचारांसाठी फेवीपिरावीर नावाची टॅबलेट बाजारात आणली असून त्याची किंमत प्रति गोळी 59 रुपये आहे. ही गोळी सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या कोरोना बळींच्या उपचारांसाठी प्रभावी आहे. हेटेरो यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, डीसीजीआयने कंपनीला फेवीपिरावीर औषध निर्मिती व बाजारपेठ करण्यास परवानगी दिली आहे. कंपनीने हे फेवीपिरावीर या नावाने भारतात सुरू केले आहे.

कंपनीने यापूर्वी कोरोनाच्या उपचारांसाठी कोविफर (रेमेडिसिव्हिर) सुरू केली होती. क्लिनिकल चाचण्यांनी या औषधासाठी सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. आशा आहे की, हे औषध रुग्णांना खूप फायदा देईल. हे औषध हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडमार्फत विक्री आणि वितरण केले जाईल. हे औषध बुधवारपासून देशभरातील किरकोळ औषध दुकानात उपलब्ध झाले आहे. औषध खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचा फॉर्म दाखवावा लागतो. कंपनीने हे औषध देशातच बनवले आहे. याच्या उत्पादनात आंतरराष्ट्रीय मानदंडांचे पूर्णपणे पालन केले आहे.

दुसरीकडे, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लसीचा विकास जोरात सुरू आहे. कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी मोडर्ना यांनी विकसित केलेली लस माकडातील संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. एमआरएनए -1273 नावाची ही लस मोडर्ना आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीजच्या वैज्ञानिकांनी तयार केली आहे. चाचणी निकाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केले गेले आहेत. ही लस मिळाल्यानंतर माकडांनी विषाणूच्या नियंत्रणासाठी अँटीबॉडी तयार केल्या, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

Read More  दहावीत एकाच वेळी माय लेकराचे यश संपादन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या